टोमॅटोचे तिखट लोणचे (तोक्कू)

साहित्य :

  • १ किलो लालबुंद टोमॅटो
  • २ मोठे चमचे तेल
  • १ चमचा मोहरी
  • ३ चमचे उडदाची डाळ
  • २ चमचे तिखट
  • ३ चमचे मीठ
  • २ चमचे गूळ
  • अर्धा चमचा हिंग

कृती :

टोमॅटो धुवून पुसून ठेवावे. त्याचे चार किंवा आठ तुकडे करावेत. कल्हईच्या पातेल्यात तेल तापवावे. त्यात मोहरी व डाळ घालावी. डाळ तांबूस झाली की हिंग व टोमॅटो घालावे. जरा ढवळून आंच मंद करावी व पाण्याचे झांकण ठेवावे. १०-१२ मिनिटात पाणी सुटून टोमॅटो शिजत येतील. नंतर त्यात तिखट, मीठ व गूळ घालावा. ढवळून पाच मिनिटे उकळलेल की खाली उतरवावे. झांकण ठेवू नये. गार झाल्यानंतर लहान बरणीत भरावे.