तुळशीच्या बीचे लाडू

साहित्य :

  • १०० ग्रॅम तुळशीचे बी
  • २ मोठे नारळ
  • अडीच वाट्या बारीक गूळ
  • अर्धी वाटी तूप.

कृती :

नारळाच्या पाण्यात तुळशीचे बी भिजवून फुगवण्यासाठी अर्धा तास बाजूला ठेवा.नंतर जाड बुडाच्या पातेल्याच्या तळाला थोडे तूप लावा. त्यात नारळाचा चव व गूळ घालून चांगले कालवा. नंतर त्यात भिजलेले तुळशीचे बी घाला. नंतर मंदाग्निवर शिजत ठेवा. पातेल्याखाली छोटा तवा ठेवा व जाता येता हलवत रहावे. कडेने उरलेले तूप सोडावे. थोडेसे मिश्रण हातात घेऊन पाहा. गोळी वळेल असे झाले की उतरवावे व निवल्यावर लाडू कळावे.