तूर डाळीचा पुलाव

साहित्य :

 • ३ वाट्या तांदूळ
 • १ वाटी तुरीची डाळ
 • २०० ग्रॅम कांदे
 • १०-१२ लसूण पाकळ्या
 • २ इंच आले
 • २०० ग्रॅम गाजरे
 • २०० ग्रॅम बीन्स (श्रावणघेवडा)
 • २ मोठे तुकडे दालचिनी
 • ४ वेलदाडे
 • ७-८ मिरी
 • २ चमचे (चवीनुसार) मीठ
 • ४ मोथे चमचे तूप
 • आवडीनुसार सजावट

कृती :

तूर डाळीचा पुलाव

तूर डाळीचा पुलाव

डाळ व तांदूळ एकत्र धुवून तासभर बाजूला ठेवावी. बीन्सचे लहान तुकडे चिरावे. गाजराच्या चकत्या कराव्या. कांदे उभे चिरावे. आले-लसूण बारीक वाटावे. दालचिनी, मिरी व वेलदोडे एकत्र कुटावे.

तुपावर कांदा गुलाबी तांबूस परतावा व त्यावर आले-लसणाची गोळी व भाज्या घालून २-३ मिनिटे परताव्या. त्यावर डाळ-तांदूळ घालून ३-४ मिनिटे परतावे.

९ वाट्या गरम पाणी, कुटलेली मसाला पूड व मीठ घालावे. पुलाव कुकरमध्ये शिजवावा. वाढण्यापूर्वी चमचाभर साजूक तूप वरून सोडावे.