युक्तीबाज कार्यवाह

अऍड्र्यु कार्निही हा जन्माने स्कॉटीश पण अमेरीकेत स्थायिक झालेला, उदार मनाचा व्यापारी ग्रंथालये त्याचप्रमाणे सेवाभावी संस्थानां सढ्ळ हाताने मदत करी. गोर गरिबांना मदत करणाऱ्या न्युयार्कमध्या एका संस्थेला दरवर्षी येणारी तूट तो स्वत: देणगी देऊन भरुन काढी. त्याची बायकोसुध्दा त्याला साजेल अशीच परोपकरी होती.

एका वर्षी त्या संस्थेला वर्षाअखेर एकंदर साठ हजार डॉलर्सची तूट आली. साहजिकाच त्या संस्थेचा कर्यवाह कर्निजीकडे गेला व त्याने त्याने देणगी रुपाने ही तूट भरुन काढण्याची विनंती केली. यावर कार्निजी म्हणाले, संस्थेला येणारी सर्व तूट मी भरुन काढतो, म्हणून तुम्ही इतरांकडून देणग्या मिळवण्याचा प्रयत्न करत नाही असे दिसते. लोक नृत्य गायनाचे कार्यक्रम पाहण्यासाठी पाण्यासारखा पैस खर्च अकरतात. मग गोरगरिबांना मदत करणाऱ्या तुमच्या संस्थेला ते मदत कराणार नाहीत, असं होणं शक्य आहे का ? अवश्य करतील, तुम्ही त्यांना भेटत नाही, तेव्हा तू आता असं कर, साठ हजार डॉलर्सची जी तूट आली आहे, तिच्यातली निम्मी रक्कम तु प्रथम इतर ठिकाणी जाऊन देणग्यांच्या द्वारे जमा कर. उरलेली तीस हजार डॉलर्सची रक्कम त्यानंतर मी तुला देणगी म्हणून देईन. कार्निजीचे हे म्हणणे मान्य करुन, कार्यवाहाने त्याला वंदन केले व तो निघून गेला.

लगेच दुसऱ्या दिवशी त्यांनी आपल्याकडे आलेला पाहून कार्निजींनी विचारलं, काय ? अवघ्या एक तासात तू तीस हजार डॉलर्स गोळा केलेस ! कमल आहे तुझी !यावर कार्यवाह म्हणाला, एक रकमीची तीस हजार डॉलर्सची देणगी मिल्यामुळे दारोदार भटकण्यात वेल घाlaवावा लागला नाही मला.

कार्निजींनी विचारलं, अरे वा: ? कुणी दिली एवढी मोठी देणगी ?
मान खाली घालून कार्यवाह म्हणाला, आपल्या सौभाग्यवतींनी.