उपवासाचा डोसा

साहित्य :

  • बटाट्याची उपवासाची सुकी भाजी
  • अडीच वाट्या (तीन कप) वरईचे निवडलेले तांदूळ
  • जिरे अर्धा चहाच चमचा
  • मीठ
  • तूप
  • मिरची

कृती :

वरई तांदूळ चार तास पाण्यात भिजत घाला. उपसून मिक्सर मधून बारीक करून घ्या. तसेच झाकून ठेवा. चार/पाच तासांनी त्यात जिरे, थोडी वाटून घेतलेली मिरची, मीठ घालून चांगले कालवून घ्या. आचेवर तवा ठेवा. त्यावर तूप पसरून घाला. नेहमी प्रमाणे जसे डोसे करतात त्याप्रमाणे डोसे करा. भाजत आल्यावर त्यावर आधीच तयार करून ठेवलेली बटाट्याची सुकी भाजी घाला. डोसा गुंडाळून मोठ्या डिशमध्ये काढा. गरम असतानाच खा.