उपवासाची दही बोंडे

साहित्य :

  • तीन कप साबुदाणा
  • बारीक चिरलेल्या मिरच्या ३/४
  • जिरे अर्धा चहाचा चमचा
  • जरुरीइतके दही
  • तूप
  • मीठ

कृती :

प्रथम साबुदाणा निवडून घ्या. धुवा आणि दह्यामध्ये एक तास भिजत घाला. त्यानंतर त्यात चिरलेली मिरची, मीठ, जिरे टाका. मिश्रण चांगले कालवुन घ्या. कढईत तुप गरम करा. त्यात मिश्रणाची लहान-लहान थोडे करून तळून काढा. गरम असताना खा.