उपवासची धिरडी

साहित्य :

  • वरईच्या तांदळाचे बारीक दळलेले पीठ तीन वाटी
  • दोन हिरव्या मिरच्या
  • दोन कप आंबट ताक
  • भरड कुटलेले जिरे दोन चिमटी
  • थोडी कोथिंबीर चिरून
  • मीठ
  • तूप

कृती :

मिरची बारीक चिरा, सर्व पदार्थ फक्त तूप सोडून एका पातेल्यात घाला. सर्व पदार्थ चांगले कालवा. गोळा होणार नाही ते पहा. हे मिश्रण खूप पातळ वा खूप दाटसर असू नये. अर्धा तास तसेच राहू द्या. आचेवर गरम तव्यावर थोडे तूप सगळीकडे पसरेल या प्रमाणे घाला. ज्या प्रमाणे नेहमी धिरडी करतात त्या प्रमाणेच याही मिश्रणाची धिरडी करा. गरम गरम खा.