वहाणेचा लिलाव !

पंडित मनमोहन मालविय हे विद्बान व सच्छील नेते बनारस हिंदू विश्वविद्यालयाच्या उभारणीसाठी घरोघरी व गावोगावी फ़िरुन निधी गोळा करीत होते. असेच फ़िरता फ़िरता ते एका संस्थानाच्या नवाबाकडे गेले व आपण हाती घेतलेल्या कार्याची त्यांना माहीती देऊन त्यांनी त्यांच्याकडे देणगी मागितली.’
नवाब देणगी द्यायला तयार होईना म्हणून मालवियांनी त्यांच्याकडे आपलं उपरणं पसरलं व ते त्याला म्हणाले, ‘हुजूर, आपल्यासारख्यांकडे आलोय, तेव्हा रिकामे परत पाठवू नका. आपल्या इच्छेला येईल ते या उपरण्याच्या झोळीत टाका.’

उर्मट नवाबाने एका पायातली वहान काढली व ती पंडितजींच्या उपरण्यात टाकली. परंतू एवढा अपमान होऊनही न रागवता, पंडित मालवीय त्या वहाणेसकटं तिथून निघून गेले. पण दुसऱ्या दिवशीच्या दोन तिन प्रमुख वर्तमानपत्रात पुढील आशयाचे निवेदन अगदी ठळक अक्षरांमध्ये झळकले !

‘बनारस हिंदू विश्व विद्यालयाच्या उभारणीसाठी देणगी मागायला गेलो असता, एका श्रीमंत नवाबाने माझ्या झोळीत वहाण टाकली. या वाहणेचा जाहीर लिलाव दि. … रोजी …. या ठिकाणी होईल, या लिलावात वहाणेला येणारी किंमत बनारस हिंदू विश्व विद्यालयाला देणगी म्हणून देण्यात येईल व त्या वेळी ‘उदार’ नवाबाचे नाव उघड केले जाईल. तरी सर्वांनी मोठ्या संख्येने या लिलावास उपस्थित रहावे. – पंडित मोहनदास मालवीय

वृत्तपत्रात हे निवेदन झळकताच नवाबाच्या तोंडाचे पाणी पळाले. जाहिरात झळकली त्याच दिवशी संध्याकाळी अंधार पडल्यावर, त्या माथेफ़िरु नवाबाचा दिवाण जातीने पं. मालवीयांकडे गेले व हात जोडून त्यांना म्हणाला, ‘पंडितजी, आपल्याला जेवढी हवी असेल, तेवढ्या रकमेची देणगी नवाब साहेब द्यायला तयार आहेत, पण तो लिलाव तेवढा रद्द करा. आणि खांविदांची वहाण परत करा.’

पंडितजींनी मागितलेली देणगी त्या दिवाणाने आणून देताच, त्यांनी ती वहाण त्या दिवाणाला परत केली व दिवाण रद्द झाल्याचे दुसरे निवेदन वृत्तपत्रात दिले.