वालाची उसळ

साहित्य :

  • पाव किलो वाल
  • १ चमच लाल तिखट
  • मीठ चवीनुसार
  • मोठ्या लिंबाएवढा गूळ
  • २ चमचे थोडा मसाला
  • १ वाटी ओले खोबरे
  • कोथिंबीर
  • २ पळ्या तेल
  • फोडणीचे साहित्य

कृती :

तेलाच्या फोडणीत मोहरी, जिरे, हिंग, हळद घालून मोड आलेले वाल घालून ते चांगले परतावे. नंतर त्यात २ भांडी पाणी घालून उकळावे. वाल अर्धवट शिजल्यावर त्यात लाल तिखट, मीठ, गोडा मसाला, गूळ घालावा. ही उसळ शिजतानाच ओले खोबरे घालावे. उसळ खाली उतरल्यावर कोथिंबीर घालावी.

टीप : उसळ जर प्रेशर पॅनमध्ये केली तर पाणी २ भांडे घालावे. कारण त्यातील पाणी तेवढे आटत नाही. प्रेशर पॅनमध्ये १ शिटी झाली की उसळ उतरावी.