वस्त्रे

वाढत्या लोकसंख्येची गरज म्हणून या नवोदित नागरी केन्द्रातूनही वस्त्रोद्योगास आरंभ झाला. आणि थोड्याच कालावधीत येथील वस्त प्रकारांना राष्ट्रीय मान्यता लाभली. उदा. देवगिरी (आता दौलताबाद) तलम वस्त्रासाठी प्रसिद्ध होत. महंमद तुघलकास या तलम वस्त्रांनी व येथील कलाकारांनी मोहित केले म्हणून त्याने आपली राजधानी दिल्लीहून देवगिरी येथे स्थलांतरित केली. देवगिरीचे दौलताबाद करण्यात आले (इ.स. १३२२ ) या स्थलांतरामुळे येथील लोकसंख्या वाढली म्हणून वस्त्रनिर्मितीस प्राधान्य देण्यात आले. आणि कलाकारांस विशेष सवलती देण्यात आल्या. त्यामुळेच या परिसरातील पैठण, बीड, कंधार, नांदेड, लातूर आदि केन्द्रे पुढे येण्यास मदत झाली.

अमीर खुश्रू या समकालीन कवीने तलम वस्त्रांचे वर्णन अतिशय मार्मिक शब्दात केले आहे. त्याच्या सांगायचे झाल्यास ‘चंद्राची मुलायम त्वचा म्हणजेच तलम वस्त्र होय’. शंभर यार्ड मलमल सुईच्या नेढ्यातून सहज पार जात होती. या परिसरातील रेशीमही तेवढेच लोकप्रिय व आकर्षक होते. अल्लाउद्दीन खिलजीच्या लुतीमध्ये रेशमी वस्त्रांचे हजारो प्रकार होते.

देवगिरीप्रमाणेच इतर नएक केन्द्रामधून वस्त्र निर्मिती होत होती. या प्रत्येक केन्द्रात निर्माण अ होणाऱ्या वस्त्रांचे स्वतःचे असे खास वैशिष्ट्य होते. त्यामुळे त्या वस्त्रांस त्या केन्द्राच्या नांवाने ओळखळे जात होते. उदा. पैठणची पैठणी, शहागडची शहागडी, धनवडची धवडी. जैनाबादची जैनाबादी, कालिकातचे कॅलिको आणि मसोलची मस्लिन वगैरे.

महाराष्ट्रातील वस्त्रोत्पादन करणाऱ्या महत्वाच्या पेठा व त्यांचे वस्त्र प्रकार पुढे दिले आहेत.

 • औरंगाबाद – हिमरू-मशरू
 • दौलताबाद – मलमल
 • बाळापूर – चंद्रकळा साडी
 • संगमनेर – चंद्रकळा साडी
 • पैठण – असावली किंवा पैठणी, पीताम्बर, किमखाब धोतरे
 • येवला – पैठणी, जामदानी, पीताम्बर
 • तेर – मलमल
 • शहागड – शहागडी (साडी), धोतरे
 • नाशिक – जरीकाठी साडी
 • नागपूर – रेशमीकाठी धोतरजोडी
 • अमरावती – पासोडी, साडी
 • सोलापूर – खण, साडी, सुती कापड
 • तुळजापूर – खण, साडी, सुती कापड
 • कोल्हापूर – कह्ण, सुती कापड
 • अहमदनगर – सर्व प्रकारचे कापड
 • पुणे – जरतारी साडी व इतर कापडा
 • धारवाड – खण
 • पंढरपूर – घोंगडी, पासोडी, पीताम्बर
 • अकोला – पासोडी, शाल, साडी
 • बीड – पासोडी, साडी