विश्व मराठी साहित्य संमेलन टोरांटोमध्ये

 टोरांटो

टोरांटो

चौथे विश्व मराठी साहित्य संमेलन कॅनडातील टोरांटोमध्ये होणार आहे व अखिल भारतीय मराठी साहित्य महांमडळाने सविस्तर कार्यक्रम निश्चित केला आहे. या संमेलनातील विविध कार्यक्रमांत सुमारे २२ ते २५ साहित्यिकांना महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांसह सहभागी होता येणार आहे.

हे संमेलन ऑगस्टच्या सुरुवातीला होते पण यावेळेस ते ३१ ऑगस्ट ते २ सप्टेंबरदरम्यान होणार आहे.

प्रा. उषा तांबे यांनी माहिती दिली की, ‘३१ ऑगस्टला केवळ स्नेहमेळावा होणार आहे आणि संमेलनातील सर्व कार्यक्रम १ ते २ सप्टेंबर रोजी होणार आहेत. हे संमेलन ज्येष्ठ कवी ना. धो. महानोर यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. ‘चाकोरीबाहेरील लेखन’, ‘आधुनिक मराठी संस्कृतीचे मराठी साहित्यात उमटणारे प्रतिबिंब’, ‘बदलत चाललेले मराठी नाटक’ असे परिसंवादाचे विषय असतील. या संमेलनात कविसंमेलन आणि बालसाहित्यासंदर्भातील कार्यक्रमही होणार आहेत. भारतीय साहित्यिकांसह टोरांटोतील काही नागरिकही या संमेलनात उपस्थित असतील.’